निलंग्यात शिंदे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात राडा; अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लातूरच्या निलंग्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात तुफान राडा झाला. मुंबईचे आमदार आणि संपर्कप्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांचे दोन गट आपापसात भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
निलंगा शहरातील टाऊन हॉल येथे शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून आमदार मंगेश कुडाळकर उपस्थित होते. मात्र, मेळावा सुरू असतानाच शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली.
च्या
जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी आमदार कुडाळकर यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. “जिल्हाप्रमुख हटावा, पक्ष वाचवा” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी दोन्ही गट एकमेकांसमोर ठाकल्याने मेळाव्यात मोठा गोंधळ निर्माण झाला.
च्या
आमदार मंगेश कुडाळकर आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला होता. ते शांत बसण्यास तयार नव्हते. या राड्यामुळे नियोजित कार्यक्रमात मोठा व्यत्यय आला असून, निलंग्यातील शिंदे गटातील फूट आता चव्हाट्यावर आली आहे.
च्या
भविष्यातील होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्यासाठी गेलेल्या आमदारांसमोरच असा राडा झाल्याने वरिष्ठ पातळीवरून आता काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव भाषण करत असताना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रंजनाताई कुलकर्णी आदी मान्यवरांच्या समोर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्यावर माझी उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील विनोद आर्य माजी तालुकाप्रमुख भगवान जाधव यांनी रोष व्यक्त करत शिवाजी माने यांना पदावून हटवा असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे आमदार मंगेश कुडाळकर यांनी दोन्ही गटामध्ये समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा येथील शिंदे गटामध्ये दोन गट एकमेकांसमोर भिडल्याने पदाधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.

Comments are closed.