खळबळजनक! बीडमध्ये वसतीगृहातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता, तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांचा नकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बीडमध्ये आज एका खाजगी वसतीगृहातून दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटनेस मोर आल्यानंतर पालकांनी टाहो फोडला आहे. तक्रार देवूनही पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. मध्यरात्रीपर्यंत मुलींचा शोध न लागल्यास पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरामध्ये असणार्‍या शिंदेनगर येथील एका खाजगी वसतीगृहात ठेवण्यात आलेल्या दोन अल्पवयीन मुली रविवारी सकाळपासून गायब आहेत. दहा फुटाच्या कंपाऊंड वॉलच्या भींती चढून त्या जावू शकत नाहीत. गेटवर जर कायम वॉचमन असेल तर या मुली गायब कशा झाल्या? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुली गायब झाल्याची घटना घडल्यानंतर वसती चालकाने पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी चौकशी सुरू केली. घटनेची माहिती संबंधित मुलींच्या पालकांना देण्यात आली. अत्यंत गरिब आणि सामान्य कुटुंबातील या दोन मुली शिक्षणासाठी बीडमध्ये आठ महिन्यापूर्वी दाखल झाल्या होत्या. शहरातील कोणतीही माहिती त्यांना नाही. ट्युशनला आणि शाळेला जाण्यासाठी वसतीगृहाचे वाहन त्यामुळे त्या बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही. मग मुली गायब कशा झाल्या असा संतप्त सवाल विचारला जात आहे. गायब झालेल्या मुलींच्या पालकांनी शिवाजीनगर पोलिसामध्ये रितसर तक्रार दिली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास स्पष्ट नकार दिला. उलट तक्रार देणार्‍या पालकांशीच पोलिसांनी हुज्जत घातली. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी मुली सुरक्षित परत न आणून दिल्यास शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा दिला आहे.

Comments are closed.