स्टाईल जुनीच पण अंदाज नवा; दिग्वेश राठीने पुन्हा काढली ‘ती’ वादग्रस्त डायरी… पण यावेळी नक्की

दिग्वेश राठी नोटबुक सेलिब्रेशन आयपीएल २०२६, एलएसजी विरुद्ध जीटी : आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा फिरकीपटू दिग्वेश राठी (Digvesh Rathi) पुन्हा एकदा आपल्या नोटबुक सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने साई सुदर्शनला बाद केल्यानंतर खास स्टाइलमध्ये सेलिब्रेशन केले, मात्र यावेळी त्याचा अंदाज थोडा बदललेला दिसला. गेल्या हंगामात राठीला त्याच्या या सेलिब्रेशनमुळे तीन वेळा दंड भरावा लागला होता. पहिल्यांदा 25 टक्के, नंतर 50 टक्के आणि तिसऱ्यांदा पुन्हा 50 टक्के दंडासोबत एका सामन्याची बंदीही त्याच्यावर आली होती. त्यामुळे यंदा त्याचा सेलिब्रेशन थोडा टोन-डाउन दिसत आहे.

नोटबुक सेलिब्रेशनचा तो व्हिडिओ होतोय व्हायरल

आधी राठी फलंदाजाच्या डोळ्यांत डोळे घालून इशारा करायचा, पण यावेळी त्याने विकेट घेतल्यानंतर मैदानावर वाकून ‘साइन’ केल्यासारखा संकेत दिला. या बदलावरून त्याने मागील अनुभवातून धडा घेतल्याचे स्पष्ट दिसते. ही विकेट त्या वेळी आली, जेव्हा आवेश खानने कॅच घेत साई सुदर्शनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. राठीची चेंडू थोडा शॉर्ट आणि लेग साइडला होता, ज्यावर सुदर्शनने स्कूप मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट फाईन लेगवरील क्षेत्ररक्षकाच्या हाती गेला.

मैदान दिग्वेशचं, स्टाईल जुनीच पण अंदाज नवा!

आयपीएलच्या नियमांनुसार खेळाडूंचे डिमेरिट पॉइंट्स 36 महिन्यांपर्यंत वैध राहतात. राठीच्या नावावर मागील हंगामात 5 डिमेरिट पॉइंट्स जमा झाले आहेत. हे 8 पर्यंत पोहोचल्यास दोन सामन्यांची बंदी, तर 11 पॉइंट्सवर तीन सामन्यांची बंदी लागू शकते. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्याने अधिक संयम राखणं आवश्यक आहे.

गुजरातचा मोठा विजय

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊने 20 षटकांत 8 बाद 164 धावा केल्या. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4/28 अशी कामगिरी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात दमदार झाली. कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. अखेरीस गुजरात टायटन्सने 8 चेंडू राखून 7 विकेट्सने सहज विजय मिळवला.

हे ही वाचा –

MI vs RCB Asha Bhosle Tribute : सूरसम्राज्ञी आशा ताईंना वानखेडेवर श्रद्धांजली; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे डोळे पाणावले; रोहित, पांड्यासह सर्व खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले

आणखी वाचा

Comments are closed.