मुंबईला वाऱ्यावर सोडून रोहित शर्मा गेला मैदानाबाहेर, नेमकं काय घडलं?, रितिकाचा चेहराच सर्व काही
रोहित शर्मा रिटायर हर्ट MI vs RCB IPL 2026 : आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील सामन्यात मुंबईच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबईचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे मैदान सोडून बाहेर गेला आहे. फलंदाजी करत असताना रोहित शर्माच्या हॅमस्ट्रिंगला (Hamstring) दुखापत झाल्याचे दिसून आले. 13 चेंडूत 19 धावांवर खेळत असताना रोहितला धाव घेताना प्रचंड त्रास होत होता. फिजिओ मैदानावर आले, पण वेदना जास्त असल्याने रोहितने ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन माघारी परतण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या जागी आता सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.
रितिका सजदेहचा फोटो व्हायरल
रोहित शर्मा मैदानातून लंगडत बाहेर जात असताना स्टँड्समध्ये बसलेली त्याची पत्नी रितिका सजदेह कमालीची चिंतेत दिसली. रितिकाचे भावूक झालेले फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रोहितच्या दुखापतीचे गांभीर्य पाहून ती प्रचंड अस्वस्थ दिसत होती, ज्यामुळे चाहत्यांच्या काळजीत अधिकच भर पडली आहे.
मुंबई इंडियन्ससाठी चांगली बातमी नाही, पायाला दुखापत झाल्याने रोहित शर्मा पुन्हा बाहेर#MIvsRCB pic.twitter.com/aZo2ZLofqR
— flicksX18 (@flicks_X18) 12 एप्रिल 2026
मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या?
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा झटका मानला जात आहे. सलामीवीर म्हणून रोहित चांगल्या लयीत दिसत होता. आता त्याच्या अनुपस्थितीत मधल्या फळीवर मोठी जबाबदारी असणार आहे.
मुंबई आणि बंगळुरु सामन्यात काय घडलं?
आयपीएल 2026 च्या 20 व्या सामन्यात आज वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण आरसीबीच्या सलामीवीरांनी त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला आहे. आरसीबीने मुंबईसमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. फिल सॉल्ट (78), रजत पाटीदार (53) आणि विराट कोहली (50) यांच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत चार गडी गमावून 240 धावा केल्या. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
तुला असे निघून जाताना पाहून वेदना होतात…💔
लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना, 🙏
परत ये, रोहित शर्मा 💙 pic.twitter.com/EiEfx5GgJ9— MI फॅन्स आर्मी™ (@MIFansArmy) 12 एप्रिल 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.