सौदी अरेबियात निसर्गाचा कोप; मुसळधार पावसामुळे अनेक शहरे जलमय, शाळांना सुटी जाहीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सौदी अरेबियाच्या अनेक भागांत सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या गंभीर इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बाधित भागांतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सौदी अरेबियातील रस्ते आणि सखल भागांत पाणी साचले आहे. मक्का, मदिना आणि रियाधसह अनेक प्रमुख शहरांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून, अनेक ठिकाणी गाड्या पाण्यात तरंगताना दिसत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सरकारने अनेक प्रांतांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्गांच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments are closed.