'ध्रुवस्त्र' पाकिस्तानसाठी घातक ठरणार आहे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

डीआरडीओकडून विकसित ध्रूवास्त्र क्षेपणास्त्र भारतीय सैन्याच्या ताफ्यात सामील होण्यास पूर्णपणे तयार आहे. हे हेलिकॉप्टरमधून डागता येणाऱ्या नाग रणगाडाभेदी दिशानिर्देशित क्षेपणास्त्राचे (एटीजीएम) आधुनिक वर्जन आहे, ज्याला पूर्वी हेलिना नावाने ओळखले जात होते. हे नवे क्षेपणास्त्र आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला मजबुती प्रदान करण्यासोबत युद्धाच्या मैदानात खासकरून उंच पर्वतीय भागांमध्ये भारतीय वायुदल आणि भूदलाच्या मारक क्षमतेला अनेक पटीने वाढविणार आहे.

ध्रूवास्त्र भारताच्या इंटीग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्रामचा हिस्सा आहे. याची कल्पना 1980 च्या दशकात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात मांडण्यात आली होती. नाग क्षेपणास्त्र समुहाच्या अंतर्गत आतापर्यंत जमिनीवरून डागण्यात येणारे नाग, कॅरियर (एनएएमआयसीए) आणि मॅन-पोर्टेबल (एमपीएटीजीएम) यासारखे अनेक वर्जन तयार करण्यात आले आहेत. ध्रूवास्त्र या समुहाचे हवाई वर्जन आहे.

ध्रूवास्त्रची वैशिष्ट्यो..

-ध्रूवास्त्रची सर्वात मोठी शक्ती याची थर्ड-जनरेन फायर अँड फॉरगेट प्रणाली आहे.

-एकदा लक्ष्यावर लॉक झाल्यास क्षेपणास्त्र स्वयंचलित पद्धतीने त्याला ट्रॅक करत नष्ट करते.

-हे खराब हवामान आणि अंधारातही शत्रूच्या रणगाड्यांची उष्णता ओळखत त्यांना अचूक लक्ष्य करू शकते.

-आधुनिक रणगाड्यांचा वरील हिस्सा सर्वात कमकुवत असतो, ध्रूवास्त्र प्रथम उंचीरव जाते आणि मग थेट वरून हल्ला करते.

-ध्रूवास्त्र क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 7 किलोमीटरपर्यंत असल्याने युद्धभूमीवर ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

-43 किलोग्रॅम वजनाचे हे क्षेपणास्त्र 800 मिलीमीटर जाड स्टील प्लेटला भेदण्याची क्षमता बाळगून आहे.

स्वदेशी हेलिकॉप्टर्सना शक्ती

ध्रूवास्त्रला विशेष स्वरुपात लडाखसारख्या उंचीयुक्त क्षेत्रांसाठी तयार करण्यात आले आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) निर्मित रुद्र आणि प्रचंड यासारख्या अटॅक हेलिकॉप्टर्समधून हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते. अलिकडेच सरकारने 156 प्रचंड हेलिकॉप्टर्सची ऑर्डर दिली आहे. या हेलिकॉप्टर्सवर ध्रूवास्त्र तैनात केल्याने भारतीय सैन्याला सीमेवर शत्रूचे रणगाडे आणि चिलखती वाहनांच्या विरोधात एक निर्णायक आघाडी प्राप्त होणार आहे.

सरकारने सप्टेंबर 2023 मध्ये जवळपास 700 कोटी रुपयांच्या खर्चातून 200 हून अधिक ध्रूवास्त्र क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी दिली होती. एका क्षेपणास्त्राचा खर्च 1 कोटी रुपयांपेक्षा कमी राहण्याचा अनुमान आहे. याच्या तैनातीनंतर भारताला रशिया किंवा युरोपकडून कोंकुर्स आणि मिलान यासारख्या जुन्या क्षेपणास्त्रांची आयात करण्याची गरज भासणार नाही. ध्रूवास्त्रच्या यशानंतर डीआरडीओ आता एसएएनटीवर काम करत आहे. याचा मारक पल्ला आणखी अधिकार असेल आणि यात मिलिमीटर-वेव रडार आणि आधुनिक सेंसर जोडलेले असणार आहेत.

Comments are closed.