वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, हिंदुस्थानी तरुणाचा अमेरिकेत धबधब्यात बुडून मृत्यू
वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय हिंदुस्थानी वंशाच्या इंजिनिअरचा अमेरिकेतील धबधब्यात बुडून मृत्यू झाला. सिंगिरेड्डी साई श्रीहरीकृष्णा असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आंध्र प्रदेशातील रहिवासी असून त्याने अमेरिकेत आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यानंतर सेंट लुईस येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत तो नोकरी करत होता.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, वाढदिवस साजरा करण्यासाठी साई शनिवारी कॅलिफोर्नियातील धबधब्यावर मित्रांसोबत गेला होता. साईला पोहायला आवडत असल्याने तो धबधब्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. मदत पथकांनी धबधब्यात शोधमोहीम राबवून साईचा मृतदेह बाहेर काढला.
Comments are closed.