Ratnagiri News – करबुडे गावच्या तेजस जाधवची कमाल; हिमालयातील अन्नपूर्णा बेस कॅम्प अवघ्या साडेतीन दिवसांत सर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी तालुक्यातील करबुडे गावचा सुपुत्र तेजस अनिल जाधव याने हिमालयातील नेपाळस्थित ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’ यशस्वीरित्या सर करून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. समुद्रसपाटीपासून 4130 मीटर उंचीवर असलेला हा बेस कॅम्प अत्यंत आव्हानात्मक मानला जातो, मात्र तेजसने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ही मोहीम फत्ते केली.

विशेष म्हणजे, जो ट्रेक पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारणपणे पाच ते सहा दिवस लागतात, तोच कठीण प्रवास तेजसने प्रतिकूल हवामानाशी झुंज देत अवघ्या साडेतीन दिवसांत पूर्ण केला. 3 एप्रिल रोजी मुंबईहून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर 5 एप्रिलपासून त्यांनी प्रत्यक्ष ट्रेकला प्रारंभ केला होता. सततचा पाऊस, जोरदार बर्फवृष्टी आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीचा सामना करत 8 एप्रिल रोजी सकाळी त्यांनी बेस कॅम्पवर यशस्वी चढाई केली. क्षणोक्षणी बदलणारे वातावरण आणि घसरड्या बर्फाळ वाटा अशा संकटांवर मात करत इतक्या कमी कालावधीत ही कामगिरी केल्याबद्दल तेजस जाधवचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments are closed.