शेन वॉर्नचा मृत्यू COVID-19 Vaccine मुळे? सक्तीने ‘तीन ते चार’ लसींचे डोस…; मुलाचा खळबळजनक दावा

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या निधनाला चार वर्षे पूर्ण झाली असताना, त्याचा मुलगा जॅक्सन वॉर्न याने एका पॉडकास्टमध्ये वडिलांच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावा केला आहे. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असला, तरी त्यासाठी जॅक्सनने कोरोना लसीला (COVID-19 Vaccine) जबाबदार धरले आहे. कामाच्या निमित्ताने वॉर्नला सक्तीने ‘तीन ते चार’ लसींचे डोस घ्यावे लागले होते आणि त्यामुळेच त्याचे निधन झाले असावे, असे मत जॅक्सनने ‘2 Worlds Collide’ पॉडकास्टमध्ये व्यक्त केले.

जॅक्सन म्हणाला की, जेव्हा त्याला वडिलांच्या मृत्यूची बातमी समजली, तेव्हा त्याच्या मनात पहिला विचार सरकार आणि लसीबद्दलच आला होता. वडिलांना आरोग्यासंदर्भात काही समस्या नक्कीच होत्या, मात्र लसीमुळे त्या समस्या अधिक बळावल्या आणि मृत्यू ओढवला. त्यावेळी अंत्यविधीच्या वेळी हे विचार जाहीरपणे न मांडणे हा योग्य निर्णय होता, अन्यथा आज परिस्थिती वेगळी असती, असेही त्याने नमूद केले. वडिलांच्या मृत्यूसाठी लसीला जबाबदार धरल्याने मनात निर्माण होणारा राग कोणासाठीही चांगला नसल्याने आपण त्यावर जास्त विचार करणे टाळतो, अशी कबुलीही त्याने दिली.

IPL 2026 – KKR सोबत भिडण्यासाठी ‘यलो आर्मी’ सज्ज, धोनीच्या ‘एन्ट्री’वर अद्याप प्रश्नचिन्हच

वडिलांच्या जीवनशैलीबद्दल बोलताना जॅक्सनने सांगितले की, शेन वॉर्न धूम्रपान आणि मद्यपान करत असले तरी मृत्यूच्या वेळी ते बऱ्याच अंशी फिट आणि आनंदी दिसत होते. 80-90 वर्षांचे अनेक लोक वॉर्न यांच्यापेक्षा जास्त धूम्रपान आणि मद्यपान करतात, तरीही ते जगतात, असा तर्क त्याने यावेळी बोलताना मांडला. निधनापूर्वी काही काळ आधी वॉर्न यांनी ‘The Hundred’ स्पर्धेदरम्यान कोरोनावर मात केली होती आणि त्यावेळी त्यांना कोणताही मोठा आजार असल्याचे समोर आले नव्हते.

IPL 2026 – KKR सोबत भिडण्यासाठी ‘यलो आर्मी’ सज्ज, धोनीच्या ‘एन्ट्री’वर अद्याप प्रश्नचिन्हच

थायलंडमध्ये 52 व्या वर्षी झालेल्या शेन वॉर्नच्या या अकाली निधनाने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले होते. जॅक्सनने आता या विषयावर पुन्हा भाष्य केल्यामुळे लसीकरणाच्या परिणामांबाबतची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जॅक्सनच्या मते, हा विषय आता वादग्रस्त उरलेला नाही कारण अनेक लोक आता यावर उघडपणे बोलू लागले आहेत.

Comments are closed.