ABP Majha Top Headlines: ABP Majha टॉप 10 हेडलाईन्स. 15 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2026 | बुधवार
1. पुढील चार दिवस राज्यात उष्णतेची लाट, तर 18 आणि 19 एप्रिल रोजी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/yrwtpta8 अकोल्यात तापमान 44 डिग्री सेल्सियसवर, उष्माघाताने एकाचा मृत्यू https://tinyurl.com/543x8kwc
2. अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन आहे का ते तपासा, त्याच दिवशी खरातने ठाण्यातील एका हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार केले, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा दावा https://tinyurl.com/2nybu2r6 रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 फोन कॉल, सगळ्यात मोठा कॉल 22 मिनिटांचा, अंजली दमानियांनी सगळंच बाहेर काढलं https://tinyurl.com/4n6jf9nm अशोक खरात प्रकरणाशी संबंध असलेल्या उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील याला बडतर्फ करून अटक करा, दमानियांची मागणी https://tinyurl.com/3mk9d53b
3. अमरावतीतील आरोपीप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर आणि रुपाली चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल, महिलांवर अत्याचार होऊनही मंत्री आदिती तटकरे एक शब्दही का बोलत नाहीत? सुषमा अंधारेंची जोरदार टीका https://tinyurl.com/yadm39df एकनाथ शिंदे शिर्डीला आले होते त्यावेळी दीपक केसरकरांच्या आग्रहाखातर आपण अशोक खरातकडे गेलो, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा https://tinyurl.com/2f6knkt2
4. दोघांच्या मृत्यूनंतर गोरेगाव नेस्कोतील म्युझिक कॉन्सर्ट पार्टी वादाच्या भोवऱ्यात, कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी, ॲपच्या माध्यमातून कुरियरद्वारे अमली पदार्थ पुरवले, तपासातून धक्कादायक माहिती उघड https://tinyurl.com/ycytxbuf म्युझिक कॉन्सर्टचं रेट कार्ड एबीपी माझाच्या हाती, कॉन्सर्टमध्ये स्टेज टेबलचा दर 3 लाखांपर्यंत, तर व्हीआयपी टेबलचा दर एक ते दीड लाख, अव्वाच्या सव्वा दर असूनही कॉन्सर्टला गर्दी https://www.youtube.com/watch?v=wKh6C8qwisg
5. शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा आदित्य ठाकरेंनी फेटाळली, पक्षात असं कोणतंही पद देण्यावर चर्चा झाली नसल्याचा दावा https://tinyurl.com/3xnsns5m
6. मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स 1 मे पासून रद्द होणार, राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा विरोध https://tinyurl.com/bdf3h5ha
7. लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोनं दोन हजारांनी महागल्याने प्रतितोळा भाव 1 लाख 53 हजारांवर, तर चांदीच्या दरातही चार हजार रुपयांची वाढ https://tinyurl.com/3jbcwxcu
8. बेळगावात सैराट चित्रपटासारखी धक्कादायक घटना, मुलगी दुसऱ्या जातीच्या प्रियकरासोबत पळून गेली, भावाने विष देऊन संपवलं https://tinyurl.com/2j59xzn3 पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, 47 वर्षांच्या नराधमाला अटक https://tinyurl.com/f9cbyuhu
9. डीजेमध्ये नाचण्याचा वाद विकोपाला, पाच युवकांनी एकाला भोसकलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला चंद्रपुरात गालबोट https://tinyurl.com/2ebyhku4 धुळ्यात अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू, तरुणी सहा महिन्यांची गर्भवती, रक्तदाब वाढल्याने झटके येऊन मृत्यू https://tinyurl.com/psd524s7
10. कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा 32 धावांनी विजय, केकेआरच्या सुमार कामगिरीमुळे कर्णधार अजिंक्य रहाणेची चिंता वाढली https://tinyurl.com/4h6wwhzc कोलकात्याने तब्बल 25 कोटी मोजून विकत घेतलेला कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप https://tinyurl.com/mrj5zytc
एबीपी माझा स्पेशल
राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयाला उच्च सुरक्षेचं कवच, मंत्रालयाच्या भोवती असणार घातक एलिट गार्डचे संरक्षकांचे कडे https://tinyurl.com/yc3jk3j4
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
आणखी वाचा
Comments are closed.