Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात
Live Blog Updates: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आजपासून पुढील 2 दिवस हे विशेष अधिवेशन होणार आहे, 2029 च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षण कायदा लागू करण्याच्या उद्देशाने आणलेल्या या विधेयकाचे अधिकृत नाव ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ असे आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण लागू करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलविण्यात आलं आहे. यासाठी घटना दुरुस्ती करण्यात येणार असून, लोकसभेत सध्या 543 खासदार आहेत. ही संख्या 850 पर्यंत वाढणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
Comments are closed.