विद्यार्थ्यांसाठी संस्कारक्षम ऑडिओ बुक्स, प्रबोधन कुर्ला शाळेचा अभिनव उपक्रम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रबोधन कुर्ला शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कारक्षम ऑडिओ बुक्स तयार करण्यात येणार आहे. या ऑडिओ बुक्समध्ये निवडक कथा वाचनाचा समावेश असेल.

लोणावळा येथे पार पडलेल्या सहविचार सभेत हा निर्णय घेतला आहे. ही दोन दिवसीय सहविचार सभा शिवसेना उपनेते संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये आणि संस्कार रुजवण्यासाठी शाळेने एक पाऊल पुढे टाकत त्यांच्यासाठी अनमोल प्रकाशनच्या निवडक गोष्टींचे वाचन करून संस्कारक्षम ऑडिओ बुक्स तयार करण्याचे निश्चित केले. सभेत पुण्याच्या अनमोल प्रकाशनचे नरेंद्र नांदूरकर यांनी उपक्रमासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी डिजिटल शिक्षणतज्ञ हर्षल माने यांच्यासह विश्वस्त शलाका कोरगावकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चिकणे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विशाखा परब, शुभांगी मेमाणे, भरत पाटील, सुदर्शन शिर्पे, हर्षल माने उपस्थित होते.

Comments are closed.