25 लाख नागरिक गरिबीच्या खाईत, युद्धाचा हिंदुस्थानला मोठा फटका बसणार; संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचा अहवाल
आखाती देशातील वाढत्या संघर्षामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे हिंदुस्थानातील सुमारे 25 लाख नागरिक गरिबीच्या खाईत लोटले जाण्याची भीती संयुक्त राष्ट्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. याचा हिंदुस्थानच्या मानवी विकास निर्देशांकावरही प्रतिपूल परिणाम होणार आहे.
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे यूएनडीपीने ‘पश्चिम आशियातील लष्करी संघर्ष ः आशिया आणि प्रशांत क्षेत्रावरील मानवी विकासाचे परिणाम’ या नावाचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार इंधन, मालवाहतूक आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या क्रयशक्तीवर परिणाम होत आहे. यामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक अर्थकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
मानवी विकास निर्देशांकाचा विचार करता हिंदुस्थानच्या प्रगतीला 0.03 ते 0.12 वर्षांचा ब्रेक लागू शकतो. 24 लाख 64 हजार 698 लोक गरिबीच्या खाईत ढकलले जातील.
आखाती देशांतील आयात-निर्यात हिंदुस्थानच्या एपूण निर्यातीपैकी 14 टक्के आणि आयातीपैकी 20.9 टक्के व्यापार पश्चिम आशियाई देशांशी होतो.
युद्धजन्य परिस्थितीचा फटका बासमती तांदूळचहा, हिरे- दागिने आणि कापड उद्योगांवर होतो.
93.7 लाख हिंदुस्थानी आखाती देशात कार्यरत असून देशात येणाऱया एपूण परकीय चलनात 38 ते 40 टक्के वाटा या देशांचा आहे.
40 टक्के कच्चे तेल, 90 टक्के एलपीजी पश्चिम आशियातून येतो.
Comments are closed.