CBSE इयत्ता 10वीचा निकाल जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘सीबीएसई’ने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी सीबीएसई रिझल्ट वेबसाईट आणि डिजीलॉकरवर आपला दहावीचा निकाल तपासू शकतात. तसेच उमंग अॅपद्वारेही आपला निकाल पाहू शकतात. ‘अपार आयडी’ आधीच सीबीएसई नोंदींशी जोडलेला असल्यास विद्यार्थी डिजीलॉकरच्या ‘इश्यूड डॉक्युमेंट्स’मध्ये जाऊन आपला निकाल प्राप्त करू शकतात. नेहमीप्रमाणे, यावर्षीही मुलींनी मुलांपेक्षा जास्त उत्तीर्णतेच्या टक्केवारीत चांगली कामगिरी केली आहे. बोर्डाने यावर्षी अधिकृत टॉपरची यादी जाहीर केलेली नाही, परंतु विशिष्ट विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रे दिली जातील.
सीबीएसई दहावीचा निकाल लवकर जाहीर करण्यामागील एक मुख्य कारण म्हणजे, यावर्षी दहावीच्या परीक्षा दोनदा घेतल्या जाणार आहे. परीक्षेचा दुसरा टप्पा पुढील महिन्यात 15 मे पासून सुरू होणार आहे. या नवीन प्रणालीअंतर्गत, विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची अतिरिक्त संधी मिळेल. या वर्षीची उत्तीर्णतेची टक्केवारी आणि विभागातील सर्वोत्तम कामगिरी निकालाच्या लिंकसोबत जाहीर केली जाईल.
Comments are closed.