युक्रेनच्या रोबोट आर्मीसमोर रशियाचे सरेंडर, मिलिटरी पोस्टवर मिळवला ताबा; झेलेन्स्की यांचा मोठा दावा
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला आता चारपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. एवढी वर्षे लोटली तरी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष काही थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. अशातच रशियन सैनिकांनी युक्रेनच्या रोबो आर्मीसमोर आत्मसमर्पण केल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. युव्रेनी सैन्याने रोबोटिक सिस्टिम आणि मानवरहित हवाई वाहनांच्या मदतीने रशियाच्या एका पोस्टवर कब्जा केला, असे झेलेन्स्की यांनी सांगितले आहे.
कारवाईबाबत अधिक माहिती देताना झेलेन्स्की म्हणाले, या युद्धाच्या इतिहासात पहिल्यांदाच शत्रूच्या एका पोस्टवर पूर्णपणे मानवरहित प्लॅटफॉर्म, ग्राऊंड सिस्टिम आणि ड्रोनच्या माध्यमातून कब्जा केला. हे अभियान पुठल्याही लष्कराशिवाय तसेच पुठलेही नुकसान होऊ न देता पूर्ण करण्यात आले.
झेलेन्स्की यांनी पुढे सांगितले की, 2026 सालच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये जमिनीवरून युद्ध लढणाऱया रोबोटिक प्रणालींनी युक्रेनच्या आघाडीच्या फळीत राहून कामगिरी बजावली आहे. पुठल्याही सैनिकाच्या जागी रोबोटला सर्वात धोकादायक परिसरात पाठवण्यात आल्याने 22 हजारांहून अधिक सैनिकांचे प्राण वाचले आहेत. हे तंत्र मानवी जीविताच्या सुरक्षेचे एक उत्तम उदाहरण आहे, असेही झेलेन्स्की यांनी सांगितले.
Comments are closed.