अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या न्यायाधीश रुपल पटेल बडतर्फ
अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने हिंदुस्थानी वंशाच्या इमिग्रेशन न्यायाधीश रुपल पटेल यांना पदावरून हटवले आहे. त्यांनी एका हाय-प्रोफाईल डिपोर्टेशन प्रकरणाला स्थगिती दिली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. शुक्रवारी बडतर्फ करण्यात आलेल्या 6 न्यायाधीशांमध्ये रुपल पटेल यांचा समावेश होता. पटेल यांची 2024 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांचा प्रोबेशन कालावधी संपणार होता. जानेवारीमध्ये त्यांनी तुर्की वंशाची विद्यार्थिनी रुमेयसा ओजतुर्प हिच्या डिपोर्टेशनविरोधात निर्णय दिला होता.
Comments are closed.