अजिंक्य रहाणेला दंड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चेन्नई सुपर किंग्जकडून झालेल्या पराभवातून सावरण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला आणखी एक धक्का बसला आहे. कोलकात्याने नियोजित वेळेत 20 षटके पूर्ण न केल्यामुळे रहाणेवर 12 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. बीसीसीआयने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 अंतर्गत ही कारवाई केली. अधिकृत निवेदनानुसार, या हंगामातील कोलकात्याची ही पहिली चूक असल्याने केवळ कर्णधारावर दंड आकारण्यात आला आहे. आयपीएलच्या नियमानुसार प्रत्येक संघाला 20 षटके पूर्ण करण्यासाठी सुमारे 90 मिनिटांचा कालावधी दिला जातो. निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाल्यास त्याला ‘स्लो ओव्हर रेट’ मानले जाते. सामनाधिकारी आणि पंच यावर लक्ष ठेवतात आणि खेळाचा वेग राखण्याची जबाबदारी कर्णधारावर असते.

दरम्यान, हाच प्रकार पुन्हा घडल्यास दंडाची रक्कम वाढू शकते. दुसऱ्या वेळी कर्णधारावर 24 लाखांचा दंड आणि इतर खेळाडूंवर मॅच फीचा काही टक्का दंड आकारला जाऊ शकतो. तिसऱ्या वेळी मात्र कर्णधारावर 30 लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदीही लागू शकते.

Comments are closed.