पुणे संघटना सुपर डिव्हीजन फुटबॉल 2026: जीओजी एफसी, सीएमएस फाल्कन्स, थंडरकॅट्ज एफसी यांचे सनसनाटी विजय
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत साखळी फेरीत जीओजी एफसी, सीएमएस फाल्कन्स, थंडरकॅट्ज एफसी या संघांनी सनसनाटी विजयाची नोंद केली. बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत जीओजी एफसी संघाने डेक्कन इलेव्हन एफसी संघावर 7- 0 असा एकतर्फी विजय मिळवला.
जीओजी एफसी संघाकडून सुमित भंडारी (4, 63मि.) याने दोन गोल, प्रकाश थोरात (16मि.), सतीश हवालदार (18मि.), प्रेमकुमार भोयर (20मि.), निखिल माळी (39मि.), सूरजबहादूर थापा (68मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या संघर्षपूर्ण सामन्यात अर्हव जोधवानी (7मि.), ओम ढमाले (26मि.), अभिषेक सिंग (55मि.), शुभम राय(77मि.) यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर थंडरकॅट्ज एफसी संघाने चेतक एफसी संघाचा 4-3 असा पराभव केला. पराभूत संघाकडून निखिल पडवळ (5, 39मि.), पवन कापडे (88मि.) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
अन्य लढतीत निशित हेगडे (26, 52मि.) याने केलेल्या गोलांच्या जोरावर रेंजहिल्स यंग बॉईज एफसी संघाने रिअल पुणे युनायटेड एफसी संघाचा 3-1 असा पराभव केला. इंद्रायणी एससी संघाने न्यू इंडिया सॉकर क्लब संघाचा 4-3 असा कडवा प्रतिकार केला. विजयी संघाकडून आयुष दीपक (8मि.), जगथ राज (19मि.), अजय राठोड (60मि.), शुभम पोटघन (85मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. सीएमएस फाल्कन्स संघाने फातिमा इलेव्हन संघाचा 4-0 असा सहज पराभव केला.
निकाल: साखळी फेरी:
जीओजी एफसी: 7(सुमित भंडारी 4, 63मि., प्रकाश थोरात 16मि., सतीश हवालदार 18मि., प्रेमकुमार भोयर 20मि., निखिल माळी 39 मि., सूरजबहादूर थापा 68मि.)वि.वि.डेक्कन इलेव्हन एफसी: 0;
थंडरकॅट्झ एफसी: 4(अरव जोधवानी 7 मि., ओम ढमाले 26 मि., अभिषेक सिंग 55 मि., शुभम राय 77 मि.) व्ही.व्ही. चेतक एफसी: 3 (निखिल पडवळ 5,39 मि., पवन कापडे 88 मि.);
रेंजहिल्स यंग बॉईज एफसी: 3 (निशित हेगडे 26, 52मि., निकील नारायणन 56मि.) वि.वि.रिअल पुणे युनायटेड एफसी: 1 (यश गटकल 56 मि.);
इंद्रायणी एससी: 4(आयुष दीपक 8 मि., जगथ राज 19 मि., अजय राठोड 60 मि., शुभम पोटघन 85मि.) वि.वि.न्यू इंडिया सॉकर क्लब: 3 (झेफनिया मेनेझिस 25 मि., कार्तिक भंडारी 45 मि., साहिल मडावी 63 मि.);
सीएमएस फाल्कन्स: 4 (मनीष ठाकरे 11, 32 मिनिटे, ऋग्वेद येवले 16 मिनिटे, अमन सेन 74 मिनिटे) व्हीव्ही फातिमा इलेव्हन: 0;
संगम एससी: 1 (क्लॅडिओ नॉन्गप्लुह 44मि.) बरोबरी वि.युकेएम कोथरूड एफसी: 1 (रोहित रावत 59मि.)
Comments are closed.