IPL 2026 – रोहित शर्मा पुन्हा मैदानात धमाका कधी करणार? कर्णधार हार्दिक पंड्याने दिली महत्त्वाची अपडेट
IPL 2026 मध्ये आज (16 एप्रिल 2026) मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्सशी होत आहे, मात्र या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्मा खेळत नाहीये. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या मागील सामन्यात रोहितच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. पंजाबविरुद्धच्या टॉस दरम्यान कर्णधार हार्दिक पांड्याने रोहितच्या दुखापतीबाबत मोठे अपडेट दिले.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबईने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. रोहितच्या जागी अनुभवी क्विंटन डी कॉकचे संघात पुनरागमन झाले असून, युवा खेळाडू मयंक रावतलाही पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. याशिवाय मिचेल सँटनर देखील आजारपणामुळे या सामन्याला मुकला आहे. संघाच्या कामगिरीवर बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला की, “आम्ही आतापर्यंत चांगले क्रिकेट खेळलो आहोत, पण काही महत्त्वाच्या क्षणांचा फायदा घेता न आल्याने आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात आम्ही विजय मिळवण्याचा प्रयत्न करू.” रोहित शर्माच्या दुखापतीवर हार्दिक म्हणाला की, रोहितला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अजून काही सामन्यांचा अवधी लागू शकतो, त्यामुळे त्याच्या मैदानावरील पुनरागमनाबाबत सध्या अनिश्चितता आहे.
या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी पाचारण केले. पंजाबने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबईचे फलंदाज २० षटकांत पंजाबसमोर किती धावांचे आव्हान उभे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुणतालिकेत आपली स्थिती सुधारण्यासाठी मुंबईसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
Comments are closed.