Akshaya Tritiya Look : अक्षय्य तृतीयेला नेसा या साड्या अन् मिळवा आकर्षक लूक

अक्षय्य तृतीयेला पारंपरिक साड्या नेसून खास लूक बनवतात. तुम्हालाही यंदा अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने खास दिसायचे असेल तर कोणत्या साड्या नेसता येतील? त्यावर दागिने, हेअरस्टाईल कशी करायची ते पाहूयात.

पैठणी

प्रतिमा स्त्रोत: Google

महाराष्ट्राची शान असलेली पैठणी अक्षय्य तृतीयेसाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. तुम्ही गडद रंगाची जसे की लाल, हिरवा, पिवळा किंवा जांभळा अशा रंगाची पैठणी नेसू शकता.

बनारसी सिल्क

प्रतिमा स्त्रोत: Google

पारंपरिक लूकसोबत ट्रेंडी लूक हवा असल्यास लाल किंवा गोल्डन-यलो बनारसी साडी नेसू शकता.

कांजीवराम

प्रतिमा स्त्रोत: Google

जर तुम्हाला साधी पण भारी साडी हवी असेल तर कांजीवरम साडी उत्तम पर्याय आहे.

चिकनकारी किंवा जॉर्जेट

प्रतिमा स्त्रोत: Google

जर तुम्हाला हलकी आणि स्टायलिश साडी हवी असेल तर पेस्टल रंगांची चिकनकारी किंवा जॉर्जेट साडी ट्राय करू शकता.

लूक पूर्ण करण्यासाठी टिप्स

सोन्याचे किंवा पारंपरिक दागिने साडीवर खूप छान दिसतात.
हलका मेकअप आणि साडीला मॅचिंग लिपस्टिक लावावी.
अंबाडा बांधून गजरा लावावा.
तुम्ही केस मोकळे किंवा हाफ बन देखील बांधू शकता.

टीप – या दिवशी काळा आणि जास्त गडद रंगाचे कपडे घालणे टाळावे.

हेही वाचा – Kids Traditional Outfit : बच्चेकंपनीसाठी हे आहेत परफेक्ट ट्रे़डिशनल आऊटफिट

Comments are closed.