MSRTC : एसटी प्रवाशांसाठी खुशखबर!! मोफत शौचालय आणि 30 रुपयात चहा-नाश्ता मिळेल

MSRTC | महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी बनलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) सेवा आजही लाखो प्रवाशांचा आधार आहे. आजही प्रत्येकाला ही बस आपला हक्क वाटतो. ही लाल परी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी प्रकाशझोतात धावते आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देते. दररोज लाखो प्रवासी त्यांच्या कामासाठी, शिक्षणासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करण्यासाठी या सेवेचा वापर करतात. आता या प्रवाशांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे एसटीचा प्रवास आतापासून अधिक सुरक्षित, अधिक आरामदायी आणि कमी खर्चिक होणार आहे.
प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनुसार १ जूनपासून राज्यातील सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांना मोफत उपलब्ध करून दिली जातील. म्हणजे प्रवासी त्यांचा मोफत वापर करू शकतील. प्रवाशांचे आरोग्य आणि स्वच्छतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांसाठी शुल्क आकारले जात होते, त्यामुळे गरीब आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना अडचणी येत होत्या. आता ही सेवा मोफत करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
तसेच, आता बसस्थानकातील कॅन्टीनमध्ये प्रवाशांना चहा-नाश्ता ३० रुपयांमध्ये देणे बंधनकारक करण्यात आले आहे. एसटी स्थानकात नाश्ता करताना प्रवाशांकडून जाणीवपूर्वक जादा पैसे घेतल्याच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कोणत्याही बसस्थानकावर हा नियम न पाळल्यास संबंधित कॅन्टीनवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत. MSRTC
दरम्यान, एसटी महामंडळाला बळकटी देण्यासाठी सरकार टप्प्याटप्प्याने आठ हजार नव्या बसेस ताफ्यात समाविष्ट करणार आहे. यामुळे जुन्या बसेसच्या जागी नवीन, सुरक्षित आणि अधिक आरामदायी बसेस येतील. ग्रामीण भागातील बसची सध्याची कमतरता कमी होईल आणि प्रवाशांना अधिक नियमित आणि वेळेवर सेवा दिली जाईल.
Comments are closed.