आयईडी स्फोटात सहा जवान जखमी.

झारखंडमधील सारंडा जंगलातील घटना

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडला नक्षलमुक्त करण्याच्या उद्देशाने पश्चिम सिंहभूम जिह्यातील चाईबासाच्या सारंडा जंगलात लपून बसलेल्या आणि 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या सीपीआय (माओवादी) पॉलिटब्युरो सदस्य मिसिर बेसराच्या शोधासाठी चालवलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाला दगाफटका सहन करावा लागला. नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफ कोब्रा बटालियनचे एकूण सहा जवान जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांमध्ये कोब्रा 205 बटालियनचे इन्स्पेक्टर सत्य प्रकाश, तसेच कोब्रा 210 बटालियनचे जवान शैलेश कुमार दुबे, उत्तम सेनापती, जितेंद्र कुमार राय, प्रेम कुमार आणि हेड कॉन्स्टेबल अभिनय मित्तल यांचा समावेश आहे. येथे सुरक्षा दलांकडून नक्षलवादी पथकाविरोधात शोधमोहीम सुरू आहे.

Comments are closed.