नाकेबंदी सुरूच राहिली तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार नाही; इराणने अमेरिकेला ठणकावलं, ट्रम्प यांचे ‘ते’ 7 दावेही खोडून काढले

होर्मुझची सामुद्रधुनी आता व्यापारासाठी पूर्णपणे खुली झाली असून तेहरान समुद्ध युरेनियम अमेरिकेच्या हवाली करणार असल्याचे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यामुळे मध्य पूर्वेतील युद्ध आता थांबले असे वाटले होते. मात्र ट्रम्प यांचा हा दावा इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी असत्य असल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका तासात सात खोटे दावे केल्याचा गंभीर आरोप मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी केला आहे. अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून होर्मुझची बंद करण्याच्या आपल्या इराद्याचा इराणने पुनरुच्चार केला आहे. जर अमेरिकेने इराणची नाकेबंदी सुरूच ठेवली, तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहणार नाही. या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक केवळ निश्चित मार्गाने आणि इराणच्या परवानगीनेच होईल, असे त्यांनी ठणकावले.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी एका तासात सात खोटे दावे केले आहेत. अशा प्रकारच्या लबाडीमुळे युद्धात किंवा चर्चेत कोणतेही यश मिळणार नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीची स्थिती आणि तिथले नियम हे सोशल मीडियावरील घोषणांवरून नव्हे तर जमिनीवरील प्रत्यक्ष कृतीवरून ठरवले जातील, असेही मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याआधी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी युद्धविरामाच्या काळात व्यावसायिक जहाजांसाठी ही सामुद्रधुनी खुली राहील असे विधान केले होते. मात्र, इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘फार्स’ने अराघची यांच्या या विधानावर शंका उपस्थित केली असून यामुळे इराणी नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर आणि ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला की, इराणने अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रमाला स्थगिती देण्याचे मान्य केले आहे. तसेच इराण समुद्र युरेनियम अमेरिकेकडे सोपवण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. हे दावे आता इराणने फेटाळून लावते आहे. इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी इराण आपले समृद्ध युरेनियम परदेशात पाठवणार नसल्याचे स्पष्ट केले. इराणचे समृद्ध युरेनियम कुठेही हस्तांतरित केले जाणार नाही; अमेरिकेला युरेनियम देणे हा आमच्यासाठी कधीच पर्याय नव्हता, असे ते म्हणाले.

ट्रम्प यांनी हिंदुस्थानला दूर लोटलं आणि पाकिस्तानला जवळ केलं; अमेरिकेच्या माजी राजदूताचं मोठं विधान

Comments are closed.