IPL 2026: प्लेऑफ गाठण्यासाठी मुंबई इंडियन्सला कराव्या लागतील 4 मोठ्या गोष्टी! अन्यथा कॅप्टन पांड्याच्या अडचणीत होणार वाढ
आयपीएल (IPL) 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी (MI) आतापर्यंत खूपच निराशाजनक झाली आहे. संघात मॅच-विनर गोलंदाज असूनही त्यांना अपेक्षित यश मिळत नाहीये, आणि फलंदाजीची अवस्थाही काहीशी तशीच आहे. याच कारणामुळे फ्रँचायझीला सलग चार पराभवांचा सामना करावा लागला आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya under captaincy) नेतृत्वाखाली संघाची स्थिती सध्या बिकट आहे. तरीही, मुंबईकडे अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे, पण त्यासाठी त्यांना जोरदार पुनरागमन करत या 4 गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल.
मुंबईला जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल, तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) ठराविक अंतराने विकेट्स मिळवाव्या लागतील. तो संघाचा मुख्य गोलंदाज असल्याने त्याची कामगिरी निर्णायक ठरेल. तसेच मधल्या फळीचा कणा असलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अजूनही आपल्या लयीत दिसलेला नाही. संघाला मोठी धावसंख्या उभं करण्यासाठी त्याच्या बॅटमधून धावा येणे अत्यंत आवश्यक आहे.
गेल्या काही सीझनमध्ये चमकलेल्या तिलक वर्माला (Tilak verma) यावर्षी संघर्ष करावा लागत आहे. त्याला आपली जबाबदारी ओळखून फलंदाजीत सातत्य राखावे लागेल. याचबरोबर हार्दिक पांड्याला केवळ कर्णधारपदावर अवलंबून राहून चालणार नाही, तर त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर स्वतःला सिद्ध करावे लागेल.
2020 मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर मुंबई इंडियन्सला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. 2025 मध्ये त्यांनी प्लेऑफ गाठले होते, पण क्वालिफायर 2 मध्ये त्यांचा प्रवास थांबला. आता 2026 मध्ये पुनरागमन करण्यासाठी या प्रमुख खेळाडूंना आपला सर्वोत्तम खेळ दाखवावाच लागेल.
Comments are closed.