CSK vs SRH: 4,4,4,6,6… अभिषेक शर्माने रचला इतिहास! चेन्नईविरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक ठोकत मोडला स्वतःचाच विक्रम
आयपीएल 2026 च्या 27 व्या सामन्यात हैदराबादच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) वादळी फलंदाजी करत इतिहास रचला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) त्याने पॉवरप्लेमध्येच अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावून आपलाच जुना विक्रम मोडीत काढला.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबादच्या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड (Travis Head & Abhishek Sharma) आणि अभिषेक शर्मा यांनी 4 ओव्हर्समध्ये 38 धावा केल्या. त्यानंतर 5 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीला आलेल्या मॅथ्यू शॉर्टच्या एकाच ओव्हरमध्ये अभिषेकने 3 चौकार आणि 2 षटकार खेचत 25 धावा वसूल केल्या. यासह त्याने आयपीएल कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक पूर्ण केले.
SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज
15 चेंडू: अभिषेक शर्मा वि. चेन्नई (2026)
16 चेंडू: अभिषेक शर्मा वि. मुंबई (2024)
16 हिट्स: ट्रॅव्हिस हेड डेफ. दिल्ली (२०२४)
16 चेंडू: ट्रॅव्हिस हेड वि. लखनऊ (2024)
अभिषेकने 22 चेंडूत 59 धावांची खेळी केली. दरम्यान, ट्रॅव्हिस हेड 23 धावा करून बाद झाला, तर कर्णधार ईशान किशन गोल्डन डकवर बाद झाला. अभिषेक शर्मा 8 व्या ओव्हरमध्ये जेमी ओव्हरटनचा शिकार ठरला.
Comments are closed.