नितीन पाटील यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ai द्वारे फोटो रंगीत करा

कल्याणमधील ज्येष्ठ शिवसैनिक नितीन पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दिवंगत माजी महापौर कल्याणी पाटील यांचे पती व जिल्हाप्रमुख शरद पाटील यांचे ते भाऊ होत.

कबड्डीपटू असलेल्या नितीन पाटील यांनी सुरुवातीस कोळसेवाडीमध्ये उपशाखाप्रमुख म्हणून कार्य करत. नंतर त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱया सांभाळल्या. त्यांच्या निधनामुळे निष्ठावंत शिवसैनिक हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Comments are closed.