Mango City: रत्नागिरी नाही…भारताची खरी ‘मँगो सिटी’ आहे ही! नाव ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
उन्हाळा आला की आंब्याचा विषय निघणारच घराघरात आंब्याच्या फोडी, आमरस आणि सुट्ट्यांच्या आठवणी महाराष्ट्रात हापूसचा दबदबा असला, तरी भारतात आंब्याचं साम्राज्य खूप मोठं आहे. पण एक मजेशीर प्रश्न भारताची “Mango City” कोणती? अनेकजण रत्नागिरी किंवा कोकणातल्या एखाद्या गावाचं नाव किंवा मलिहाबाद घेतील… पण खरं उत्तर थोडंसं वेगळं आहे. (which is mango city of india)
‘मँगो सिटी’ एवढी खास का?
एखाद्या शहराला ‘मँगो सिटी’ म्हणण्यासाठी फक्त चव नाही, तर उत्पादनाचं प्रमाण, आंब्याची विविधता आणि त्या भागाचा ऐतिहासिक वारसा महत्त्वाचा ठरतो.
या शहरात सुपीक जमीन, योग्य हवामान आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेतीची परंपरा यामुळे आंब्याची उत्कृष्ट गुणवत्ता टिकून आहे. इथले शेतकरी पारंपारिक आणि आधुनिक तंत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन करतात.
रत्नागिरीचे मलिहाबाद?
रत्नागिरीचा हापूस आणि उत्तर प्रदेशातील मलिहाबादचा दशहरी हे दोन्ही आंबे जगभर प्रसिद्ध आहेत. तरीही, जेव्हा उत्पादन, विविधता आणि निर्यात या सगळ्यांचा एकत्र विचार केला जातो, तेव्हा एक वेगळंच शहर पुढे येतं.
अखेर कोणती आहे भारताची ‘मँगो सिटी’?
भारताची अधिकृत ‘मँगो सिटी’ म्हणून ओळखलं जाणारं शहर म्हणजे मालदा Malda.पश्चिम बंगालमधील हे शहर केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही आंब्याच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. इथली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात आंब्यावर आधारित आहे. त्यामुळे आंबा हा फक्त फळ न राहता, इथल्या संस्कृतीचा आणि ओळखीचा भाग बनला आहे.
आंबा म्हटलं की आपल्या मनात हापूस येतो, पण भारताची ‘मँगो सिटी’ ही ओळख मालदाला मिळाली आहे. म्हणजेच, आंब्याचं खरं साम्राज्य एका राज्यापुरतं मर्यादित नाही तर देशभर पसरलेलं आहे. आणि म्हणूनच, पुढच्या वेळी “मँगो सिटी” विचारलं, तर उत्तर नक्की लक्षात ठेवा.
Comments are closed.