तन्वी कोलते ठरली बिग बॉस मराठीची विजेती!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी सिझन 6’ने महाराष्ट्राच्या मनात आपली वेगळी छाप उमटवत या पर्वाची दिमाखदार सांगता केली. यंदाच्या सीजनचे विजेतेपद कोण पटकावणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर तो क्षण आला. तन्वी कोलते बिग बॉस मराठी सिझन 6 ची विजेती ठरली. तिला कलर्स मराठीकडून 15 लाख रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली. विजेती ठरल्यानंतर भावना व्यक्त करताना तन्वी कोलते म्हणाली, ‘हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला आणि प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या पुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱया प्रत्येकाला समर्पित करते.’ अंतिम फेरीत विजेतेपदासाठी तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद या पाच सदस्यांमध्ये चुरस होती.

Comments are closed.