वडाळा टीटीजवळ उभी असलेल्या खासगी बसला आग, अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वडाळा टीटी परिसरातील आरटीओजवळ रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या खासगी बसला सोमवारी (20 एप्रिल) दुपारी अचानक आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलासह विविध आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही मिनिटांतच आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे 2 वाजता आगीची माहिती मिळाली आणि अवघ्या 10 मिनिटांत म्हणजेच 2.10 वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली. घटनास्थळी दोन बस बाहेरून जळालेल्या अवस्थेत दिसत होत्या. दुसऱ्या बसमध्ये आतून किरकोळ ज्वाळा दिसत असल्याने अग्निशमन कर्मचारी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते.

या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, पोलीस, 108 रुग्णवाहिका सेवा आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व यंत्रणांनी समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Comments are closed.