राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूवर 1 वर्षाची बंदी! पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मोठी कारवाई
पाकिस्तान सुपर लीगशी (PSL) संबंधित एक मोठा वाद समोर आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू दसुन शनाकावर एक वर्षाची बंदी घातली आहे. PSL मधून अचानक माघार घेतल्यामुळे त्याच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली आहे.
IPL 2026 सुरू होण्यापूर्वी, राजस्थान रॉयल्सने सॅम करनच्या जागी दसुन शनाकाचा आपल्या संघात समावेश केला होता. शनाकाने 21 मार्च 2026 रोजी PSL मधून एकतर्फी नाव मागे घेतले होते. PCB च्या चौकशीत असे आढळले की, शनाकाने दिलेली कारणे कराराच्या नियमात बसणारी नव्हती आणि त्याने नियमांचे उल्लंघन केले होते. यामुळे संतप्त झालेल्या PCB ने त्याच्यावर ही कारवाई केली. सुनावणी दरम्यान शनाकाने आपली चूक मान्य केली आणि दिलगिरी व्यक्त केली.
तो म्हणाला, PSL मधून माघार घेतल्याबद्दल मला मनापासून खेद वाटतो. पाकिस्तानमधील चाहते आणि लाहोर कलंदर्सच्या समर्थकांची मी माफी मागतो. जेव्हा मी PSL सोडले, तेव्हा माझा दुसऱ्या कोणत्या लीगमध्ये खेळण्याचा विचार नव्हता. भविष्यात पुन्हा या लीगमध्ये पुनरागमन करण्याची आशाही त्याने व्यक्त केली.
या बंदीमुळे दसुन शनाका PSL 2027 च्या हंगामात खेळू शकणार नाही. PCB ने स्पष्ट केले आहे की, लीगची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि शिस्त राखण्यासाठी कराराचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही खेळाडूवर अशीच कडक कारवाई केली जाईल.
Comments are closed.