Central Railway : डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत; पहिल्याच दिवशी कामाचा खोळंबा

Central Railway : डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत; पहिल्याच दिवशी कामाचा खोळंबा

मुंबई : तांत्रिक बिघाड आणि लोकल उशिराने धावणे हे समीकरण मध्ये रेल्वेसाठी नवीन नाही. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान रिकाम्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली. त्यामुळे सध्या 15 ते 20 मिनिटे मध्य रेल्वेवरील लोकल सेवा उशिराने धावत आहेत. याचा फटका कामावर निघालेल्या प्रवाशांना बसत असून अनेक स्थानकांवर गर्दी झाल्याचे चित्र आहे.

Comments are closed.