पाकिस्तानची दादागिरी की जळफळाट? श्रीलंकेच्या कॅप्टनवर घातली बंदी; क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं का
PCB दासुन शनाका PSL मधून बंदी : आयपीएल ही फक्त भारतातीलच नाही, तर जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-20 लीग मानली जाते. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील नामांकित खेळाडू इतर कोणतीही लीग सोडण्यास तयार असतात. यंदा असेच एक उदाहरण पाहायला मिळाले आहे. कारण आयपीएल 2026 आणि पाकिस्तान सुपर लीग (PSL) या दोन्ही स्पर्धा एकाच वेळी खेळल्या जात आहेत. त्यामुळे काही खेळाडूंनी पीएसएल ऐवजी आयपीएलला प्राधान्य दिले, ज्यामध्ये श्रीलंकेचा टी-20 कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) हाही समाविष्ट आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शनाकावर पीएसएलमधून एका वर्षासाठी बंदी घातली आहे. (PCB Dasun Shanaka Banned From PSL)
IPL साठी PSL ला नकार
पीएसएलच्या 11व्या हंगामासाठी लाहोर कलंदर संघाने दासुन शनाकाला 75 लाख पाकिस्तानी रुपयांत आपल्या संघात घेतले होते. मात्र शनाकाने पीएसएलमध्ये खेळण्यास नकार दिला आणि आयपीएलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला.
शानाकाने एक वर्षाची PSL बंदी 🚨 दिली
आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्समध्ये सामील होण्यासाठी लाहोर कलंदर्ससोबतच्या कराराचा भंग केल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) श्रीलंकेचा T20 कर्णधार दासून शनाकावर अधिकृतपणे एक वर्षाची बंदी घातली आहे. pic.twitter.com/UDMuw7cwgK
— क्रिकेट बुद्धी (@Cricketadd75277) 20 एप्रिल 2026
PSL कडून 1 वर्षाची बंदी (PCB Dasun Shanaka Banned From PSL)
राजस्थान रॉयल्सने शनाकाला 2 कोटी रुपयांत संघात घेतले होते. तो सॅम करनच्या रिप्लेसमेंट म्हणून संघात आला होता. मात्र पीएसएलला नकार दिल्यामुळे पीसीबीने शनाकावर कारवाई करत त्याला एका वर्षासाठी लीगमधून बॅन केले आहे. त्यामुळे तो पीएसएल 2027 मध्ये खेळू शकणार नाही.
PSL 2027 मधून दासून शानाकावर बंदी.
– शनाकाने आयपीएलसाठी पीएसएल सोडले. pic.twitter.com/iKnIa9oKOz
— मुफद्दल वोहरा (@mufaddal_vohra) 20 एप्रिल 2026
मुजारबानीवर यापूर्वी 2 वर्षांची बंदी (PCB Blessing Muzarabani Banned From PSL)
यापूर्वीही पीसीबीने ब्लेसिंग मुझाराबानीवर कारवाई केली होती. मुजारबानीने पीएसएलसोडून आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि तो केकेआर संघात सामील झाला होता. यामुळे PCB ने त्याच्यावर 2 वर्षांची बंदी घातली होती, तर शनाकावर 1 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.