एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
एसआयपी शुल्क नवी दिल्ली: जर तुम्ही एसआयपी म्हणजेच सिस्टिमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्यासंदर्भातील शुल्का संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. नियम महिती नसल्यानं तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. काही लोक एसआयपी सुरु करण्यावर लक्ष देतात, मात्र छोट्या छोट्या रकमेच्या शुल्कासंदर्भात विचारणा करत किंवा माहिती घेत नाहीत. एसआयपीचा हप्ता बँक खात्यातून वजा न झाल्यास शुल्क द्यावं लागू शकतं.
SIP हप्ता वेळेत न जमा केल्यास काय होतं?
जर तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसेल आणि एसआयपीचा हप्ता वजा होऊ शकला नाही तर बँका 250 रुपये ते 750 रुपये दंड प्रति व्यहार लावू शकते. याशिवाय 18 टक्के जीएसटी देखील आकरला जातो. जर वेळेत एसआयपीचा हप्ता वजा नाही झाला तर मोठा दंड भरावा लागू शकतो.
किती नुकसान होईल?
म्युच्युअल फंड जाणखारांच्या मते एखाद्या दिवशी तुमचा एसआयपी हप्ता वेळेत न भरु शकल्यास दंड वेगानं आकारला जाऊ शकतो. समजा एक व्यवहार वेळत होऊ शकला नाही तर 500 दंड आकारला जात असेल आणि पाच वेळा एसआय़पी फेल झाली असेल तर 2500 रुपये निधी आणि जीएसटीसह रक्कम 2950 रुपयांवर पोहोचते. काही गुंतवणूकदारांकडून याकडे दुर्लक्ष केलं जात.
काही गंतुवकणूकदारांच्या मते व्यवहार शुल्क आकारला जातो. यासाठी एका एका महिन्याची पहिली तारीख एसआयपीसाठी सेट केल्यास नुकसान टळू शकतं. भारतात एसआयपी प्रामुख्यानं एनपीसीएल आणि एनएसीएच यंत्रणे द्वारे एसआयपीच्या तारखा निश्चित केल्या जातात. यातून बँक खात्यातून ऑटोमेटिक पैसे काढण्यास मान्यता दिली जाते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.