अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा

Baramati byelection Sunetra Pawar Rally: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  निधनानंतर बारामतीत होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासह पवार कुटुंबीयांनी बारामती (Baramati bypoll 2026) पिंजून काढल्यानंतर मंगळवारी याठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडणार आहे.  सभेसाठी मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे (सुप्रिया सुळे) हेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, सभास्थळी दादांच्या आठवणींना उजाळा देणारे काही भावनिक फोटो लावण्यात आले आहेत. हे फोटो बारामतीकरांच्या भावना जागृत करणारे ठरत असून अनेकांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जात आहेत. या माध्यमातून दादांच्या कार्याची आणि त्यांच्या सहवासाची आठवण उपस्थितांना करून दिली जात आहे. (Maharashtra Politics news)

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मंगळवारी सकाळी सभास्थळी येऊन सर्व गोष्टींची पाहणी केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना म्हटले की, आजच्या सभेला मुख्यमंत्री साहेब, उदय सामंत, रामदास आठवले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते येणार आहेत. दादांच्या आठवणी बारामतीच्या कणाकणात आहेत, तुम्हाला लोकांच्या भावनांतून त्या कळतील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. आजच्या सभेला सुप्रियाताई येणार आहेत. याशिवाय पवार कुटुंबातील अनेकजणही येतील. पवार साहेबांची प्रकृती बरी नाही, त्यामुळे अजून त्यांचा मला काही निरोप आलेला नाही. पण सुप्रिया ताई नक्की येतील, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.

अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी येत असताना त्यांचे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बारामतीत पोटनिवडणूक होत असून सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आकाश मोरे यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या शिष्टाईनंतर काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली होती. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरला नव्हता. तरीही सुनेत्रा पवार यांच्याविरोधात 22 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

Parth Pawar: सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणायचं आहे: पार्थ पवार

बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी त्या किती मताधिक्याने निवडून येणार, ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. बारामतीच्या आजपर्यंतच्या इतिहासात अजित पवार हे कायम मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी फक्त जिंकून चालणार नाही, तर त्यांना मोठे मताधिक्यही मिळणे गरजेचे आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी सांगितले की, मला एवढाच मेसेज द्यायचा आहे की, सुनेत्रा वहिनी निवडून येणार आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मग अनेक लोक म्हणतील वहिनी निवडून येणार आहेत, मग मतदान करायला कशाला यायचे. पण आपल्याला एक रेकॉर्ड तोडायचा आहे. दोन लाख 17 हजाराचा रेकॉर्ड तोडायचा आहे. त्यामुळे मी विनंती करतो की, मतदान करायला बाहेर पडा, असे आवाहन पार्थ पवार यांनी बारामतीच्या मतदारांना केले होते.

आणखी वाचा

अजितदादांच्या तपासाला दिरंगाई का? मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे, अमोल मिटकरींचा सरकारला घराचा आहेर, तर रोहित पवारांचा थेट इशारा, म्हणाले 10 मेपर्यंत….

आणखी वाचा

Comments are closed.