Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
राज्यातील दोन मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकांपैकी बारामती विधानसभा मतदारसंघात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीची जाहीर सांगता सभा संपन्न झाली. या सभेत महायुतीमधील सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाषण करताना सुनेत्रा पवार यांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलंय. सभेला सुप्रिया सुळे यांनी सभेला हजेरी लावून अजित दादांची आठवण सांगत त्यांच्या आई म्हणजेच आशा काकींना भेटल्याचं म्हटलं. दरम्यान, सभेत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी भाषण करताना शरद पवारांनी दिलेल्या मेसेजची आठवण सांगत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याबद्दलही भाष्य केलं. बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून उदय सामंत आणि रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अजित पवार यांनी जो विक्रम केला होता, तो बारामतीची जनता मोडून सुनेत्रा पवार यांना विजयी करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. आम्ही अजित पवार यांच्या पक्षाला सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पुढे नेण्याचा प्रयत्न करू, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले.
Comments are closed.