ब्रम्ह मुहूर्तावर जाग ,असू शकतात शुभ संकेत





आपल्याला कधी कधी  मध्यरात्री अचानक जाग येते. त्यावेळी झोप पूर्ण झाल्याने आपल्याला जाग आली असावी असा आपण विचार करतो. तर कधी कधी घाबरतो.  पण जर तुम्हाला पहाटे ३.३० ते ५.३० या वेळेत अचानक खडबडून जाग आली असेल तर ही सामान्य घटना असल्याचे समजू नका.

कारण हिंदूधर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार ब्रम्हमुहूर्तावर म्हणजे पहाटे ३.३० ते ५.३० या वेळेत जाग येणे हे अध्यात्मिक उन्नतीचे संकेत असून तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडणार असल्याचे ते भाकित आहे. ब्रम्ह मुहू्र्त म्हणजे सूर्यादय होण्याच्या दिड तास आधीचा वेळ. ही वेळ परमेश्वराची साधना, आराधना, ध्यानधारणा आणि पूजेसाठी सर्वात श्रेष्ठ वेळ समजली जाते. यावेळी वातावरण शांत आणि सकारात्मक असते. त्यामुळे शरीर आणि मनावर त्याचे सकारात्मक परिणाम होतात. यामुळे ब्रम्हमुहूर्त अमृतवेल नावानेही ओळखले जाते.

ब्रम्हमुहू्र्तावर उठल्याने काम लवकर होतात.नशीब फळफळते. नवीन संधी निर्माण होतात. यासमयी गायत्री मंत्र आणि भगवान विष्णु आणि शिवाचा मंत्रजप केल्याने लाभ होतो असे म्हटले जाते.



Comments are closed.