केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, वाढीव महागाई भत्त्याची अंमलबजावणी सुरु, पगार किती वाढणार?

DA वाढ बातम्या नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी अपडेट समोर आलं आहे. वित्त मंत्रालायनं आता महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळं महागाई भत्ता 58 टक्क्यांवरुन 60 टक्क्यावंर पोहोचला आहे. 60 टक्के महागाई भत्ता 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून जारी करण्यात नोटिफिकेशननुसार या प्रस्तावाला राष्ट्रपतींकडून अगोदरच मंजुरी मिळाली होती.

18 एप्रिलला महागाई भत्ता वाढीची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भाववाढीची भरपाई करण्यासाठी, मूळ वेतन/पेन्शनच्या सध्याच्या 58% दरामध्ये 2% वाढ करण्याचा निर्णय 18 एप्रिल  2026 ला घेतला होता.  केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 01 जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्याचा (DA) आणि महागाई दिलाशाचा (DR) अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंजुरी दिली आहे.
महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हीतील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी एकूण 6791.24 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. याचा फायदा सुमारे 50.46 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 68.27 लाख पेन्शनधारकांना होईल.ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकारलेल्या सूत्रानुसार करण्यात आली आहे.

पगार किती वाढणार?

केंद्र सरकारनं महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतनं 50000 हजार रुपये असेल तर पगारात 1000 रुपयांची वाढ होईल. मूळ वेतन 50000 आणि 60 टक्क्यांप्रमाणं महागाई भत्ता 30000 रुपये मिळेलं. महागाई भत्ता वाढल्यानं सरकारी  कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल.

तीन महिन्यांचा फरक मिळणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचा फरक एकाच वेळी मिळेल. एखाद्या कर्मचाऱ्याला 2 टक्के वाढीमुळं एका महिन्याच्या पगारात 1000 रुपयांची वाढ मिळणार असेल तर त्याला तीन महिन्यांचा फरक म्हणून 3000 रुपये मिळतील.

दरम्यान, केंद्र सरकार सातव्या वेतन आयोगानुसार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये  महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेते. या घोषणेस उशीर झाल्यास कर्मचाऱ्याचं  नुकसान होतं. तर, काही वेळा महागाई भत्ता फरक एकाच वेळी मिळाल्यानं कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मोठी रक्कम मिळते.

180000 रुपये मूळ वेतन असल्यास पगार 360 रुपयांनी वाढेल. तर, 25 हजार पगार असणाऱ्यांच्या पगारात 500 रुपयांची तर, 36500 मूळ वेतन असणाऱ्यांच्या पगारात 730 रुपये वाढतील. ज्यांचं मूळ वेतन 1 लाख रुपये आहे त्यांचा महागाई भत्ता  2000 रुपयांनी वाढेल. तर, ज्यांना  1 लाख 50 हजार रुपये मूळ वेतनं मिळतं त्यांच्या महागाई भत्ता 3000 रुपयांनी वाढेल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.