सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का? प्रक्रिया काय असते?

सुकन्या समृद्धी योजना नवी दिल्ली : तुम्ही जर तुमच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न नक्की येऊ शकतो.  तो म्हणजे 21 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी यामध्ये जमा झालेली रक्कम काढता येऊ शकते का? मात्र, यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. ही योजना दीर्घकालीन बचतीसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत लवचिकता आहे, शिक्षण आणि लग्न यासारख्या मोठ्या खर्चांसाठी पैसे काढता येऊ शकतात. या संदर्भातील नियमांची माहिती करुन घेत, योग्य नियोजन करत तुम्ही गुंतवणूक केल्यास अडचणीत येणार नाहीत.

सुकन्या समृद्धी योजनेतील पैसे कधीही काढता येतील असं नाही. या योजनेतून जमा केलेल्या काही रक्कमेपैकी रक्कम काढता येऊ शकते.  जेव्हा मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण होईल किंवा ती दहावी उत्तीर्ण होईल तेव्हा खात्यात जमा असलेल्या रकमेपैकी 50 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता. ही रक्कम गेल्या वर्षाच्या शेवटी जमा असलेल्या शिल्लक रकमेवर निश्चित केली जाते. याचं कारण सुकन्या समृद्धी योजनेचा पैसा मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासारख्या मोठ्या खर्चांवर खर्च व्हावा अशी सरकारची अपेक्षा असते.

सुकन्या  समृद्धी योजनेतून पैसे काढण्याचे काही नियम आहेत. तुमची मुलगी 18 वर्षं पूर्ण झालेली असावी किंवा 10 उत्तीर्ण केलेलं असावं. तेव्हा तुम्ही पैसे काढू शकता. या दरम्यान तुमच्या खात्यात शिल्लक असलेल्या एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढता येते. मात्र, ही रक्कम वर्षातून एखदाच काढता येते, ही सुविधा पाच वर्षांपर्यंत मिळते.सुकन्या समृद्धी योजनेतून ज्या कारणासाठी पैसे काढले जातात त्याचा खर्च त्याच कारणासाठी करावा लागतो.

सुकन्या समृद्धी योजनेतून पैसे कसे काढायचे?

सर्वप्रथम सुकन्या समृद्धी योजनेतून पैसे काढण्यासाठी तुमच्या मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण असावं किंवा तिने दहावी उत्तीर्ण केलेली असावी.  गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात जितकी शिल्लक असेल त्याच्या 50 टक्के रक्कम मिळेल. तुम्हाला है पैसे  शिक्षणासाठी लागणार असल्याचं कारण दिल्यास योग्य कागदपत्रं द्यावी लागतील. सुकन्या समृद्धी योजनेचं खातं जिथ म्हणजे बँक खात्यात किंवा पोस्टात असेल तर तिथं जाऊन अर्ज भरुन द्यावा लागेल. पैसे तुम्ही एका टप्प्यात किंवा विविध टप्प्यात घेऊ शकता.  सुकन्या समृद्धी योजनेतून वर्षातून एकवेळा पैसे काढता येतात. ही सुविधा पाच वर्ष लागू असेल.

सुकन्या समृद्धी योजनेचं खातं 21 वर्षांअगोदर देखील बंद करता येतं. मुलीचं लग्न करण्यापूर्वी  एक महिने किंवा लग्नानंतर पैसे काढता येऊ शकतात. दुर्दैवी प्रसंगात मुलीचा मृत्यू झाल्यास ते खातं तातडीनं बंद केलं जातं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.