नितीश कुमार यांनी नवीन JD(U) टीम तयार केली
राष्ट्रीय कार्यकारिणीत 24 नेत्यांना स्थान
वृत्तसंस्था/ पाटणा
संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीत नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांना सध्या स्थान मिळालेले नाही. संजद कार्यकारिणीत 24 नेत्यांना सामील करण्यात आले आहे. राज्यसभा खासदार संजय झा हे संजदचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असतील. तर पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रेश्वर प्रसाद चंद्रवंशी यांना पक्षाच्या उपाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. आलोक कुमार सुमन हे पक्षाचे खजिनदान असणार आहेत.
पक्षाकडून 12 नेत्यांना राष्ट्रीय महासचिव करण्यात आले आहे. तर राजीव रंजन सिंह हे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहणार आहेत. रविंद्र प्रसाद सिंह, विद्या सागर, निषाद दयानंद राय, संजय कुमार, मोहम्मद निसार, रुही तागुंग आणि निवेदिता कुमारी यांना राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर नितीश यांचे पुत्र निशांत हे 3 मे पासून बिहारच्या दौऱ्यावर असणार आहेत. निशांत यांची ही यात्रा पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातून सुरू होणार आहे. या यात्रेद्वारे निशांत हे राज्यातील सर्व 38 जिल्ह्यांमध्ये जात कार्यकर्ते तसेच जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.
Comments are closed.