लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानने कारवाई करावी; अमेरिकन खासदाराने केली कान उघडणी
अमेरिकन संसदचे खासदार ब्रॅड शर्मन यांनी पाकिस्तानला लष्कर-ए-तोयबा (LeT) सारख्या दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत कडक शब्दात कान उघडणी केली. २०२५ मध्ये झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याशी या संघटनेचा संबंध जोडला गेला आहे.
अमेरिकेतली हिंदुस्थानी दूतावासाने ‘Human Cost of Terrorism’ या विषयावरील प्रदर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमावेळी बोलताना शर्मन यांनी पहलगाम हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. २६ निष्पापांचा जीव घेणाऱ्या या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे.
बुधवारी संध्याकाळी बोलताना शर्मन म्हणाले की, ‘या घटनेत ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ने हल्लेखोरांनी निष्पाप लोकांना लक्ष्य केले आणि धर्माच्या आधारावर त्यांना वेगळे केले गेले होते. हा गट लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे मोठ्या प्रमाणावर मानले जाते, ज्याला पाकिस्तानमध्ये आश्रय मिळाला आहे’.
Comments are closed.