ठाण्यात शिवशाही बसला आग; अग्निशमन दलाच्या जवानांची कमाल, राखेच्या ढिगाऱ्यातून तीन तोळे सोनं सुरक्षित बाहेर काढलं
ठाणे स्थानकाजवळ बोईसरकडे जाणाऱ्या एका शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला होता. इंजिन व डिझेल टाकीच्या भागातून आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण बस आपल्या भक्ष्यस्थानी आणली. बसमधील 15 प्रवाशी वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, या बसमध्ये एका प्रवाशाचे साडे तीन तोळे सोनं बॅगसह अडकले होते. त्यामुळे संबंधित महिलेची धाकधूक वाढली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीने रौद्ररुप धारण केलं आणि पुण्याहून वापीला जाणाऱ्या एका महिला प्रवाशाची बॅग बसमध्येच राहिली. जीव वाचवण्याच्या गडबडीत साडे तीन तोळे सोनं आणि बॅग बसमध्येच राहिली. बस पूर्ण जळून खाक झाली. त्यामुळे संबंधित महिलेचा जीव टांगणीला लागला होता. सोनं वितळण्याच्या भीतीने महिलेची धाकधूक वाढली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. संपूर्ण बस जळून कोळसा झाली असली, तरी आश्चर्यकारक बाब म्हणजे त्या महिलेचे दागिने वितळण्यापासून वाचले. जवानांनी राखेच्या ढिगाऱ्यातून हे सोने सुरक्षित बाहेर काढून संबंधित प्रवाशाला सुपूर्द केले.
व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी वगळता सर्व मतांचा आदर करतो, सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी
ही बस ठाण्याहून पालघरमार्गे बोईसरला जाणार होती, मात्र प्रवासाच्या सुरुवातीलाच हा अपघात घडला. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि प्रवाशाचे मौल्यवान दागिनेही परत मिळाले. संपूर्ण बस खाक होऊनही सोने जसेच्या तसे मिळाल्याने प्रवाशाने सुटकेचा नि:श्वास टाकला आणि जवानांचे आभार मानले. या घटनेमुळे ठाणे स्थानक परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.
Comments are closed.