दिसताच क्षणी गोळ्या घाला, इराणच्या छुप्या हालचालींविरोधात ट्रम्प यांचे अमेरिकन नौदलाला आदेश
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी या अत्यंत संवेदनशील सागरी मार्गावर शत्रूच्या हालचाली रोखण्यासाठी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या भागात समुद्राखाली सुरुंग पेरणाऱ्या कोणत्याही नौका आढळल्यास त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता थेट बुडवून टाकण्याचे आदेश ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला दिले आहेत. ट्रम्प यांच्या ‘दिसताच क्षणी गोळ्या घाला’ (Shoot on Sight) या भूमिकेमुळे आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले आहेत.
Truth Social वर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, “मी अमेरिकन नौदलाला आदेश दिला आहे की, होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये जे कोणी सुरुंग पेरण्याचे काम करत असतील, अशा कोणत्याही नौका, मग त्या छोट्या का असेना, त्यांना दिसताच गोळ्या घालून नष्ट करावे. (लक्षात ठेवा, त्यांची सर्व १५९ नौदलाची जहाजे आधीच समुद्राच्या तळाला गेली आहेत!).”
ते पुढे म्हणाले की, “यामध्ये कोणताही संकोच केला जाऊ नये. याशिवाय आमची सुरुंग शोधणारी जहाजे सध्या हा मार्ग मोकळा करण्याचे काम करत आहेत. मी आता असा आदेश दिला आहे की, हे काम सुरूच राहील, पण आता ते तिप्पट वेगाने केले जाईल.”
Comments are closed.