Baramati And Rahuri Assembly By Election – बारामतीत ५४ तर, राहुरीत ५६ टक्के मतदान, वाचा सविस्तर
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ पर्यंत बारामतीमध्ये ५४.९६ टक्के, तर राहुरीमध्ये ५६.७२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली होती. यातच अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. दुसरीकडे राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणूक लढवत आहेत.
राज्य विधानसभा पोटनिवडणूक | भारत निवडणूक आयोगानुसार अंदाजे मतदान
उमरेठ (गुजरात) – 58.59%
राहुरी (महाराष्ट्र) – 56.72%
बारामती (महाराष्ट्र) – 54.96% pic.twitter.com/JvZET3MKbk— ANI (@ANI) 23 एप्रिल 2026
Comments are closed.