नोकरी जाण्याच्या भीतीमुळे दरवर्षी 8 लाख मृत्यू, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जाहीर केला डेटा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कार्यालयातील टॉक्सिक कल्चरमुळे तसेच नोकरी जाण्याची भीती आणि कामाचा दबाव यामुळे जगभरात दरवर्षी 8 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती जेनेव्हा जागतिक कामगार संघटनेने जारी केली आहे. कार्यालयातील टॉक्सिक वर्क कल्चरमुळे दरवर्षी 8 लाख 40 हजारांहून अधिक कर्मचारी मृत्युमुखी पडत आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लोकांना कामाशी निगडीत चिंता, अधिक वेळ कामाला देणे, नोकरी जाण्याची सततची चिंता या सर्व गोष्टींमुळे सायकोसोशल रिस्क जन्माला येते. त्यामुळेच लोकांना हृदय आणि मेंदूशी निगडीत समस्या निर्माण होत आहेत. या दोन्ही आजारामुळे अकाली मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कार्यालयातील वातावरण, सहकारी, वरिष्ठ आणि व्यवस्थापनासोबतचे संबंध व संवाद हे घटकदेखील मानसिक आजारास कारणीभूत ठरत आहेत. वर्क फ्रॉम होम, वैयक्तिक कामासाठी वेळेवर रजा न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण होते. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले नसेल तर कर्मचाऱ्यांमध्ये हृदयविकार, स्ट्रोक आणि मानसिक आजारांचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटना आणि ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अभ्यासाकडील जागतिक मृत्यू दर आणि आरोग्यविषयक डेटाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने हा डेटा प्रसिद्ध केला आहे.

Comments are closed.