RBI कडून पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; पेटीएम ॲप वापरणाऱ्यांवर काय परिणाम होणार?
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. हा निर्णय 24 एप्रिल 2026 रोजी लागू करण्यात आला असून, बँकेच्या कामकाजावर तात्काळ लागू झाला आहे. आरबीआयच्या निवेदनानुसार, बँकेने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1949 मधील नियमांचे पालन केले नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यापुढे पेटीएम पेमेंट्स बँकेला कोणत्याही प्रकारचा बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळं पेटीएम ॲपचा वापर करणाऱ्यांवर याचा परिणाम होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आरबीआयनं पेटीएम पेमेंटस बँक लिमिटेडनं बँकिंग अधिनियम कायद्याच्या विविध नियमांची अंमलबजावणी न केल्यानं ही कारवाई करण्यात आली. पेटीएम पेमेंटस बँकेचे व्यवहार सुरु ठेवणं ग्राहकांच्या हिताला बाधक ठरत होते. व्यवस्थापनाची कार्यपद्धती ठेवीदार आणि सार्वजनिक हिताविरोधात होती. बँकेकडून नियमांचे वारंवार उल्लंघन करण्यात आले. बँकेला दिलेल्या परवान्याच्या अटींचे पालन झाले नाही, यामुळं आरबीआयनं पेटीएम पेमेंट्स बँकेचं लायसन्स रद्द केलं.
पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडकडे पुरेशी तरलता (liquidity) असून, बँक बंद करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सर्व ठेवीदारांचे पैसे परत केले जातील, असं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेला यापूर्वी 11 मार्च 2022 पासून नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घालण्यात आली होती. 31 जानेवारी आणि 16 फेब्रुवारी 2024 रोजी अतिरिक्त निर्बंध घालण्यात आले. खात्यांमध्ये पैसे जमा करणे, टॉप-अप यांवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या.
पेटीएम ॲप वापरणाऱ्यांवर काय परिणाम होणार?
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या परवाना रद्द झाल्याचा परिणाम काही पेटीएम यूजर्सवर देखील होणार आहे. ज्यांची खाती पेटीएम पेमेंट्स बँकेत होती त्या खातेदारांवर परिणाम होईल.
छोटे दुकानदार आणि विक्रेते पेटीएम बँकेचा वापर करत होते त्यांना पेमेंट स्वीकारण्यात अडचणी येतील. पेटीएम ॲप सुरु ठेवण्यासाठी त्यांना थेट मुख्य बँकेशी खातं लिंक करावं लागेल. यामुळं तुमच्या मुख्य खात्यातून पैसे वजा होऊ शकतात.
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या खात्यासोबत FASTag लिंक असल्यास त्याचा वापर करणं अवघड होऊ शकतं. त्यामुळं अशा FASTag यूजर्सला नवी व्यवस्था करावी लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.