दिग्गज बंगाली अभिनेते बिप्लब दासगुप्ता यांचे वयाच्या 75 वर्षी निधन – Tezzbuzz
बिप्लब दासगुप्ता हे एक ज्येष्ठ बंगाली अभिनेते होते. त्याच्या बाबत एक दु:ख बातमी समोर आली आहे. त्याचे दीर्घ आजारानंतर शुक्रवारी येथे निधन झाले. तर आता 75 वर्षांचे होते. कौटुंबिक माहीतीनुसार , त्याच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती आणि त्याची तब्बेत सारखी बीघडायची. शुक्रवारी टॉलीगंजमधील गोल्फ क्लब रोड येथील त्यांच्या निवासस्थानी प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यानंतर दासगुप्ता यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कोलकाता. ‘गुमनामी’ आणि ‘झुल्फिकार’ ‘केमिस्ट्री मासी’, ‘जगमाया’ आणि ‘चेकमेट’ यांसारख्या टीव्ही मालिकां आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यानी साकारलेल्या अभिनयाला उत्तम प्रतिसाद मिळत असे ते एक लोकप्रिय कलाकार होते. तर त्याची निधनाची वार्ता समजताच त्याच्या चाहत्यानी, चित्रपट, दूरदर्शन आणि ओटीटी जगतातील कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
बिप्लब दासगुप्ता (dasgupta)हे बंगाली चित्रपट आणि दूरदर्शनमधील एक सुप्रसिद्ध अभिनेते होते. ते सर्वप्रथम 1998 साली प्रदर्शित झालेल्या ‘द बंगाली नाईट’ या चित्रपटातून दिसले. त्यानंतर त्यांनी 1996 साली प्रदर्शित झालेल्या ‘काहिनी’ या मालिकेत काम केले. अनेक बंगाली दूरदर्शन मालिकांमधील आपल्या उत्कृष्ट कामामुळेही त्यांनी नाव कमावले होते. तर बिप्लब दासगुप्ता यांच्या निधनापूर्वी त्यांच्या पत्नी आणि मुलीने त्यांची काळजी घेतली होती. त्याच्या जाण्यने त्याचे कुटुंब प्रचंड दुःखात आहे. आणि त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे भरपूर नुकसान झाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.