डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर गोळीबार, प्रियंका चतुर्वेदींच्या ट्विटने भारतासह जगाचं लक्ष वेधलं,

प्रियांका चतुर्वेदी डोनाल्ड ट्रम्पवर: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) थांबलेल्या हॉटेलवर गोळीबार झाला. वॉशिंग्टन डीसीमधल्या हिल्टल हॉटेलमध्ये ट्रम्प यांच्यसमोरच गोळीबार झाला. यावेळी पत्नी मेलानियाही ट्रम्प यांच्यासोबत होत्या.’व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनर’साठी ट्रम्प दाम्पत्य आलं होतं. गोळीबारानंतर दोघांनाही तातडीनं सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बॉलरुमच्या वरच्या मजल्यावर हा गोळीबार झाला. गोळीबारानंतर ‘सीक्रेट सर्व्हिस’च्या जवानांनी ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी नेलं. तसंच संशयित हल्लेखोराला जिवंत पकडलं.

प्रियंका चतुर्वेदींच्या ट्विटने भारतासह जगाचं लक्ष वेधलं- (Priyanka Chaturvedi On Donald Trump)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर गोळीबार झाला. या घटनेनंतर संपूर्ण जगभरातील नेत्यांनी ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केलेल्या एक्स पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. वॉशिंग्टन डी.सी. येथील ‘व्हाइट हाउस करस्पॉन्डन्ट्स डिनर’ कार्यक्रमातून काही चिंताजनक दृश्ये आणि गोळीबाराचे आवाज कैद करणारे व्हिडीओ समोर आले आहेत. जग इतक्या वेगाने बदलत आहे की हे बदल समजून घेणेच कठीण झाले आहे, असंही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

पुढे प्रियंका चतुर्वेदी यांनी पुन्हा एक पोस्ट केली. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हणून संबोधले होते. या विधानाचा प्रियंका चतुर्वेदी यांनी समाचार घेतला. अमेरिकेतील बंदुकांची समस्या अत्यंत गंभीर आहे. हा असा एक मुद्दा आहे जो बंदुकांसंबंधी एखादी घटना घडल्यानंतर दरवर्षी चर्चेत येतो.बंदूक हिंसाचाराचा सामना करण्याच्या बाबतीत, अमेरिका स्वतःच प्रभावीपणे एक ‘नरक’ बनली आहे, अशा शब्दात प्रियंका चतुर्वेदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले.

नरेंद्र मोदी काय म्हणाले? (Narendra Modi On Donald Trump)

सदर घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारताची भूमिका स्पष्ट केली असून ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्रपती हे वॉशिंग्टन डीसीमधील घटनेनंतर सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

कोण आहे हल्लेखोर? (Donald Trump Hotel Incident)

  • कोल टॉमस अॅलन असे 31 वर्षीय हल्लेखोराचे नाव
  • शिक्षक आणि व्हिडीओ गेम डेवलपर म्हणून काम करतो
  • टोरान्समधल्या लॉस एंजल्स उपनगरात वास्तव्याला
  • सी-2 एज्युकेशनमध्ये ‘डिसेंबर 2024 चा सर्वोत्तम शिक्षक’ पुरस्कार विजेता
  • 2017 ला कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनियर
  • अॅलन हा मेकॅनिकल इंजिनियर आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स उत्तीर्ण
  • अॅलनकडून 2024 मध्ये कमला हॅरीसना प्रचारासाठी 25 डॉलर्सची देणगी

संबंधित बातमी:

Donald Trump News: धाड धाड…गोळीबार होताच डोनाल्ड ट्रम्प खाली बसले, हॉटेलमधून निघताना खाली पडले, नेमकं काय घडलं?, PHOTO

आणखी वाचा

Comments are closed.