100 कोटी क्लबचा ‘किंग’! शाहरूख, सलमान, विजय, रजनीकांत यांना जे जमलं नाही ते खिलाडी अक्षयनं करून दाखवलं
हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीमध्ये 100 कोटी क्लबची चर्चा होते तेव्हा शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान ही तिकडी आणि दक्षिणेकडील सुपरस्टार्स रजनीकांत, विजय यांची नावे डोळ्यासमोर येतात. मात्र या शर्यतीमध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या आघाडीवर आहे. भल्या भल्या अभिनेत्यांना मागे टाकत अक्षय कुमार याने इतिहास रचला असून 100 कोटींहून अधिक कमाई करणारे तब्बल 20 चित्रपट देणारा तो हिंदुस्थानचा एकमेव अभिनेता ठरला आहे.
दोन दशकांपूर्वी आमिर खान याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘गझनी’ या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा टप्पा पार करून या स्पेशल क्लबची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत 150 हिंदुस्थानी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. यातील 20 चित्रपट हे एकट्या अक्षय कुमार याचे असून त्याने या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
अक्षय कुमार याचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटानेही 100 कोटींचा टप्पा ओलांडला असून 200 कोटींकडे त्याची वाटचाल सुरू आहे. तत्पूर्वी हाऊसफुल्ल-5, केसरी-2 या चित्रपटांनीही 100 कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. कोविडनंतर प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येण्यास कचरत असतानाही अक्षयच्या 6 चित्रपटांनी प्रेक्षकांना आपल्याकडे खेचत 100 कोटींहून अधिक कमाई केली होती.
100 कोटींहून अधिक कमाई करणारे टॉप-7 अभिनेते
- अक्षय कुमार – 20 चित्रपट
- सलमान खान – 18 चित्रपट
- अजय देवगण – 16 चित्रपट
- शाहरूख खान – 10 चित्रपट
- रणवीर सिंग – ९ चित्रपट
- ऋतिक रोशन – 8 चित्रपट
- रजनीकांत – 8 चित्रपट
- विजय – 8 चित्रपट
- प्रभास – 7 चित्रपट
Comments are closed.