स्मिता पाटील इतकी सुंदर व्यक्ती मी पाहिली नाही- नवाजुद्दीन सिद्दीकी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवाजुद्दीन सिद्दीकीने अवघ्या काही चित्रपटांच्या माध्यमातून बाॅलिवुडमध्ये आपले बस्तान बसवले. हिंदी चित्रपटसृष्टीमधील एकूण कार्यपद्धतीवर नवाजुद्दीन बरेचदा स्पष्टपणे बोलताना आपल्याला दिसतो. नुकतेच त्याने बाॅलिवुडमधील अस्तित्वात असलेल्या वर्णद्वेषाबद्दल अगदी उघडपणे भाष्य केले आहे.

‘Zoom’ ला दिलेल्या एका मुलाखतीत, नवाजुद्दीनने असे निरीक्षण नोंदवले की, बॉलिवूडमधील कथांचे कथानक हे बहुतांशी गोऱ्या रंगाच्या स्त्रियांवर केंद्रित असते. तो म्हणाला, “आपल्याकडे एक म्हण आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या झुरळाला मारता, तेव्हा लोक तुमचे कौतुक करतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्या फुलपाखराला मारता, तेव्हा ते तुमच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ही निवडक वृत्ती आजही आपल्याकडे अस्तित्वात आहे. अगदी तसेच भेदभाव करण्यामध्येही खूप निवडकपणा दिसून येतो. हा प्रकार अनेक क्षेत्रांमध्ये दिसून येतो.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, यावर अधिक स्पष्टपणे बोलताना नवाजुद्दीन म्हणाला, ज्या अभिनेत्रीला ‘सावळ्या रंगाची’ म्हणून संबोधले जाते, तिला हिंदुस्थानात सामान्य मानले जाते. पाश्चात्य देशांमध्ये मात्र तिला आकर्षक मानले जाण्याची शक्यता असते. अर्थात प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन असतो. एखादी अभिनेत्री विशिष्ट प्रकारची असेल, तर तिला मुख्य भूमिका दिली जात नाही. पण यात त्यांची काहीच चूक नसते, कारण कथाच तशा प्रकारे लिहिल्या जातात. जी मुलगी गोरी असते, तिच्यावरच कथा लिहिल्या जातात. तुम्हाला कामाबद्दलची जी प्राथमिक माहिती मिळते, तिच तशी असते. आजही अनेक जण या परिस्थितीशी झगडत आहेत,” असे त्याने पुढे नमूद केले.

नवाजुद्दीनने या संभाषणात पुढे दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचेही कौतुक केले. “कॅमेऱ्यात टिपले जाणारे सौंदर्य हे अद्वितीय असते. वैयक्तिकरित्या सांगायचे तर, स्मिता पाटील यांच्यापेक्षा अधिक सुंदर व्यक्ती मला आजवर कधीच भेटली नाही.

Comments are closed.