उन्हाळा आणि किडनी व युरिनरी इन्फेक्शन
उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे डिहायड्रेशन आणि अतिघामामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. याचा थेट परिणाम किडनी, मूत्रसंस्थेवर होतो
यामुळे यादिवसात अनेकांना लघवीला जळजळ, हाता पायाला सूज येणे यासारख्या समस्या जाणवू लागतात. पण वेळीच उपचार केल्यास रुग्ण यातून बरा होऊ शकतो. त्यासाठी याची लक्षणे व उपाय समजून घेऊया.
लक्षणे
डिहायड्रेशन
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने किडनीला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे तिचे काम बिघडू शकते.
किडनी स्टोन
उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी सतत बाहेर टाकले जाते. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. पुरेसे पाणी न पिल्यास किडनी स्टोन बनण्याची शक्यता वाढते.
मीठ व इलेक्ट्रोलाइट
उन्हाळ्यात शरीरातील सोडियम, पोटॅशियम यांचे प्रमाण बिघडते, जे किडनीसाठी धोकादायक ठरते.
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI)
यादिवसात उष्म्यामुळे सतत घाम येत असतो. यातून शरीरातील पाणी बाहेर टाकले जाते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. परिणामी मूत्र कमी तयार होते, त्यामुळे जंतू बाहेर पडत नाहीत. यातून युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजेच मूत्रसंसर्ग होतो.
लक्षणे
लघवी करताना जळजळ
वारंवार लघवी लागणे
दुर्गंधीयुक्त किंवा गढूळ मूत्र
ओटी पोटात दुखणे
ताप (काही वेळा)
उपाय
डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक्स
भरपूर पाणी पिणे
वेळेवर उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे
लघवी खूप कमी होणे, सूज येणे, किंवा खूप थकवा वाटत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.
UTI ची लक्षणे 1–2 दिवसात कमी झाली नाहीत तर उपचार घ्या
दररोज 3–4 लिटर पाणी प्या
लघवी थांबवू नका
वैयक्तिक स्वच्छता राखा
कॉटनचे सैल कपडे वापरा
जास्त वेळ ओले/घामाचे कपडे घालू नका
ORS, नारळपाणी, ताक यांचा वापर करा
किडनी रुग्णांसाठी
उपाय
योग्य हायड्रेशन (पाणी/ORS)
गंभीर स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार
इलेक्ट्रोलाइट बॅलन्स सुधारणा
लघवी खूप कमी होणे, सूज येणे, किंवा खूप थकवा वाटत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.
UTI ची लक्षणे 1–2 दिवसात कमी झाली नाहीत तर उपचार घ्या
Comments are closed.